28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रअधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांकडील खाते मंत्र्यांकडे सोपविले

अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांकडील खाते मंत्र्यांकडे सोपविले

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे सरकारचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून मुंबईमध्ये सुरू होत आहे. राज्यामध्ये सत्तानाट्य घडल्यानंतर हे पहिलेच मोठे अधिवेशन होत आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार हे निश्चित आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. विधिमंडळ कामकाजावेळी या मंत्र्यांना त्यांच्या खात्याशिवाय या खात्यांचे कामकाजही पाहावे लागणार आहे.

संजय राठोड यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन आहे. पण पावसाळी अधिवेशनात ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे काम पाहतील. याशिवाय उदय सामंत यांना माहिती व तंत्रज्ञान, शंभुराज देसाई यांना परिवहन, दादा भुसे यांना पणन, तानाजी सावंत यांना मृद व जलसंधारण, अब्दुल सत्तार यांना मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, दीपक केसरकर यांना पर्यावरण व वातावरणीय बदल, संदीपान भुमरे यांना अल्पसंख्याक व औकाफ या विभागांची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

३० जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यानंतर ३९ दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये शिवसेनेचे ९ आणि भाजपच्या ९ अशा एकूण १८ मंत्र्यांचा शपथविधी झाला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर १४ ऑगस्टला खातेवाटप जाहीर करण्यात आला. या खातेवाटपानंतर शिवसेनेचे मंत्री नाराज झाल्याची चर्चा झाली. पण या मंत्र्यांनी ही चर्चा फेटाळून लावत आम्ही नाराज नसल्याचे स्पष्ट केले.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या