25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रअनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे आवश्यक

अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे आवश्यक

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमातून मांडलेल्या भूमिकेला बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी प्रत्त्युत्तर दिले असून, शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याने अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमातून आपली भूमिका आज स्पष्ट केली. मात्र बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर जाण्याची जी भूमिका मांडली होती, त्यावर कोणतेही भाष्य केले नव्हते. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर हाच मुद्दा उचलून धरताना एकनाथ शिंदे यांनी आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी पुन्हा उचलून धरली.

शिंदे यांनी याबाबत ट्विट केले आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक फक्त भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे, शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे, असे या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या