मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत येत असतात. सध्या त्यांची इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. कारण कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अमृता फडणवीस यांना पुरस्कार मिळाला आणि त्यांनी स्वत: या फिल्म फेस्टिवलचे फोटो शेअर करत माहिती दिली.
बेटर वर्ल्ड फंडद्वारे आयोजित महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी कान्समध्ये पुरस्कार प्राप्त झाला, असे त्यांनी म्हटले आहे.