नागपूर : ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न केल्याचा देखावा करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सावनेर शहरात घडली आहे. याचा जाब विचारणा-या वडिलांनाही आरोपीने अश्लील शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याने सोशल मीडियावरही मुलीची बदनामी करणा-या पोस्ट टाकल्याचे समोर आले आहे. राजा फुले आरोपीचे नाव असून तो वॉर्ड क्रमांक ४, श्री साईनगर, गुजरखेडी, सावनेर येथील रहिवासी आहे. त्याची १७ वर्षीय मुलीसोबत ओळख झाली होती.
त्याने तिच्याशी २०१९ मध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित केले होते. तिला १५ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी १२ च्या सुमारास स्वत:च्या घरी बोलवून बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. एवढेच नव्हे तर त्याने जबरदस्तीने तिच्या गळ्यात हार टाकून सोबत फोटोही काढले होते.