23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रआता स्मिता ठाकरेही शिंदे यांच्या भेटीला

आता स्मिता ठाकरेही शिंदे यांच्या भेटीला

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण गढूळ झाले आहे. ठाकरे सरकार गेल्यानंतर बंडखोर आमदार पुन्हा स्वगृही परततील, असे बोलले जात होते. मात्र, दिवसेंदिवस शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात दुरावा वाढतानाच दिसत आहे. अशात आता ठाकरे एकाकी पडताना दिसत आहेत. कारण शिंदे गटासोबत आता भाजपनेही या वादात उडी घेतली आहे. दरम्यान, शिंदे गटाला अनेक नेते भेटत असताना आता ठाकरे घरण्यातील स्मिता ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

एकीकडे उद्धव ठाकरे शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल करीत असताना भाजपच्या नेत्यांकडूनही शिंदे गटासाठी बॅटिंग करण्यात येत आहे, तर दुसरीकडे भावकीतील ठाकरेदेखील आता उद्धव ठाकरेंच्या विरोधात उभे राहताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी शिंदे गटाची बाजू घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उद्धव यांचे वाभाडे काढले. दुसरीकडे देवेंद्र फडणवीसदेखील राज यांच्या भेटीला गेले होते. अशात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. सध्या शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात विभागली गेली आहे. अशातच स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या