22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रआमचीच खरी शिवसेना, निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करणार : शिंदे

आमचीच खरी शिवसेना, निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करणार : शिंदे

एकमत ऑनलाईन

 

मुंबई : लोकशाहीत बहुमत महत्वाचे असते. आपल्याबरोबर पक्षाचे दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदार, खासदार आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेवर चालणारा पक्ष, शिवसेना आम्हीच आहोत, असे प्रतिपादन करताना निवडणूक आयोगाकडे सर्व कागदपत्रे सादर केली जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केले.

शिवसेनेतील दुफळीचा शेवटचा अंक सुरू झाला असून, आपल्याच गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता मिळावी, हा विषय आता निवडणूक आयोगासमोर गेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही गटांनी आपलीच खरी शिवसेना आहे, असा दावा केला आहे. शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे आधीच आपले कॅव्हेट दाखल केले होते. शिंदे गटाने परवा मान्यतेसाठी अर्ज केला आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना ८ ऑगस्टपर्यंत आपले दावे सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर निवडणूक आयोग याबाबतची सुनावणी घेणार आहे.

या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपलाच गट ही अधिकृत शिवसेना असल्याच्या दाव्याचा पुनरुच्चार केला. विधानसभेतील दोनतृतीयांशपेक्षा अधिक आमदार माझ्यासोबत आहेत. लोकसभेतही खासदार माझ्यासोबत आहेत. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना तसे पत्रही दिले होते. त्यामुळे आमचीच शिवसेना खरी असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

 

 

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या