26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रआ. तानाजी सावंत यांची हकालपट्टी

आ. तानाजी सावंत यांची हकालपट्टी

एकमत ऑनलाईन

सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुखपदावरून हटविले
मुंबई : शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून आ. तानाजी सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अनिल कोकीळ यांची प्रभारी जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने वेगळी वाट पकडल्याने शिवसेनेत गळतीचे सत्र सुरू झाले आहे. यात शिवसेनेकडून बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यातच शिवसेनेने तानाजी सावंत यांना धक्का देत त्यांचे पद काढून घेतले आहे. त्यांच्या जागी अनिल कोकीळ यांची नियुक्ती झाल्याचे शिवसेनेने आपल्या मुखपत्रात म्हटले आहे. मुख्य म्हणजे कोकीळ यांची नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने करण्यात आल्याचा उल्लेख या वृत्तात करण्यात आला आहे. अनिल कोकीळ मुंबईतील शिवडीतील नगरसेवक आहेत. कोकीळ हे उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जातात.

खासगी साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट म्हणून तानाजी सावंत यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे. पुणे जिल्ह्यात इंजिनीअरिंग, फार्मसी अशा विविध महाविद्यालयासह त्यांचे ३ खासगी साखर कारखानेदेखील आहेत. रियल इस्टेट व्यवसायातही त्यांचा भलामोठा वावर आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या