25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत

इंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत

एकमत ऑनलाईन

अहमदनगर : आपल्या कीर्तनातून बेधडक वक्तव्य करून अनेकदा वाद ओढावून घेणारे अहमदनगर जिल्ह्यातील समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर पुन्हा अडचणीत आले आहेत. सुमारे दोन महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातील एका कार्यक्रमात त्यांनी दिव्यांगांसंबंधी वक्तव्य केले होते. त्या प्रकरणी पुण्यात दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे तक्रार दाखल झाली आहे. त्यावरून आयुक्तांनी अकोल्याच्या पोलिस अधिका-यांना चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.

सुमारे दोन महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर यांचे कीर्तन आयोजित केले होते. या कार्यक्रमात इंदुरीकर यांनी त्यांच्या कीर्तनाचे व्हीडिओ यू ट्यूबवर अपलोड करणा-यांवर टीका केली होती. ते म्हणाले होते, ‘माझ्या कीर्तनाच्या क्लिप बनवून चार हजार यू ट्युबवाले कोट्यधीश झाले. मलाच कोर्टात खेचले. त्यांचे वाटोळच होणार. माझ्या भाषणाचे व्हीडिओ अपलोड करून पैसे कमावणा-यांची मुले दिव्यांग जन्माला येतील, असे इंदुरीकर म्हणाले होते.

त्यांच्या या वक्तव्यासंबंधी पुण्यातील राजेंद्र वाकचौरे व दत्तात्रय भोसले यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे तक्रार केली आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्यानुसार हा गुन्हा आहे, त्यामुळे इंदुरीकर यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याची दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी दखल घेतली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या