27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रईडीकडून स्वप्ना पाटकर यांना समन्स

ईडीकडून स्वप्ना पाटकर यांना समन्स

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीनं आज स्वप्ना पाटकर यांना समन्स बजावलं आहे. त्यांनी ईडीनें आज चौकशीसाठी बोलावलं आहे. . याच प्रकरणात संजय राऊत यांना ईडीनं अटक केली आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. कोर्टानं त्यांची न्यायालयीन कोठडी 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली असताना ईडीनं स्वप्ना पाटकर यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.

राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावावर रायगड जिल्ह्यात जमीन खरेदी करण्यात आली आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर यांनी राऊत यांच्यावर काही आरोपही केले आहेत. मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत. यापूर्वीही ईडीनं स्वप्ना पाटकर यांचा जबाब नोंदवला होता. आता स्वप्ना पाटकर यांच्या चौकशीनंतर संजय राऊतांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजीत पाटकर यांचीही ईडीनं चौकशी केली होती. स्वप्ना पाटकर या सुजीत पाटकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचा घटस्फोट झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्वप्ना पाटकर यांनी ईडी कार्यालयात कागदपत्रांसह चौकशीसाठी हजेरी लावली होती. आता पुन्हा त्यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय खुलासा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या