22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रउदय सामंत व यशवंत जाधवांची शिवसेनेतून हकालपट्टी

उदय सामंत व यशवंत जाधवांची शिवसेनेतून हकालपट्टी

एकमत ऑनलाईन

मुंबई : बंडखोरीनंतर शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले. यानंतर शिवसेनेने बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा सपाटाच लावला आहे. आता शिवसेनेतून उदय सामंत आणि यशवंत जाधव यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंसोबतच्या बंडात उदय सामंत सहभागी झाले होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे आदेश काढले आहेत. दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेच्या अस्तित्वाचीच लढाई सध्या सुरू आहे. त्यात शिवसेनेतले मोठे आणि महत्त्वाचे नेते सोडून गेल्याने पक्षाला धक्का बसलाय.

अशातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश काढत उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. उदय सामंत आणि यशवंत जाधव यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या