19.2 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeमहाराष्ट्रएप्रिल महिन्यात उन्हाळा अधिक तीव्र

एप्रिल महिन्यात उन्हाळा अधिक तीव्र

एकमत ऑनलाईन

मुंबई : दिवसेंदिवस वाढत जाणा-या उन्हाच्या तीव्रतेने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात एप्रिल महिन्यात उन्हाळा अधिक तीव्र असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील किमान आणि कमाल तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहील, असे देखील हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र येथे यंदा पाऊसही जास्त राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यातल्या कमाल आणि किमान तापमानात वाढ पाहण्यास मिळू शकते याशिवाय यंदा कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊसही सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात तापमानात वाढ पाहण्यास मिळेल. तसेच कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल असादेखील अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद केली जाऊ शकते.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या