29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रओमिक्रॉनला रोखण्यासाठी राज्यात लसीकरण वाढवा

ओमिक्रॉनला रोखण्यासाठी राज्यात लसीकरण वाढवा

एकमत ऑनलाईन

मुंबई : ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून, त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण वेगाने वाढले पाहिजे, या दृष्टीने जेथे लसीकरण कमी आहे, तिथे ते वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. त्यात महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर मुला-मुलींचे वसतिगृह आणि इतर निवासी इमारती बांधण्यासाठी ९५.१५ कोटी रुपये आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरील निर्देश दिले.
गेल्या १२ तासात संपूर्ण जगात ओमिक्रॉनच्या रुग्णात ४५ टक्के वाढ झाली असून ५४ देशात याचा प्रसार झाला आहे. फ्रान्समध्ये दैनंदिन रुग्ण ४० हजारच्या पुढे आढळत असून जर्मनीत ही संख्या ५० हजाराच्या आसपास आहे. ऑस्ट्रियामध्येदेखील कोविड सुरू झाल्यापासून सगळ््यात मोठी लाट आली आहे. तिथे दररोज ७ हजारच्या आसपास नवीन रुग्ण आढळत आहेत. अमेरिकेत देखील नोव्हेंबर २०२० सारखी परिस्थिती उद्भवली असून दररोज एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. दक्षिण आफ्रिकेत गेल्या २ आठवड्यात नवीन रुग्णात मोठी वाढ झाली असून दररोज दुपटीने रुग्ण आढळत आहेत. या सगळ््या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातदेखील काळजी घेण्याची गरज असून आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळले गेलेच पाहिजे, यावर भर देण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात आणखी १० रुग्ण
जगभरामध्ये ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन विषाणूचा मोठ्या संख्येने प्रादुर्भाव होताना दिसत आहे. या नवीन विषाणूचा संसर्ग लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात होत असून, भारतातही आतापर्यंत २३ रुग्ण आढळून आले होते. त्यात आणखी दहा जणांची भर पडली आहे. चिंताजनक म्हणजे एकट्या महाराष्ट्रातच आज ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेले दहा रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली. यासोबतच सुमारे ६५ स्वॅब जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या