21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रऔरंगाबाद नामांतरावर पवार बोलले ते हास्यास्पद - इम्तियाज

औरंगाबाद नामांतरावर पवार बोलले ते हास्यास्पद – इम्तियाज

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : ‘मविआ’च्या किमान समान कार्यक्रमात औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा नव्हता. तसेच नामांतराच्या मुद्यावर सुसंवाद झाला नव्हता’ असे शरद पवार औरंगाबादमध्ये म्हणाले होते. ‘औरंगाबाद नामांतरावर पवार साहेब बोलले ते हास्यास्पद आहे’, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

एकनाथ शिंदे गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. सरकारच्या भवितव्यावर अनिश्चिततेचे सावट असताना महाविकास आघाडी सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. त्यापैकी औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय महत्त्वपूर्ण होता. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी नाराजी व्यक्त केली.

अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात व नाना पटोले नामांतरावर स्पष्टपणे बोलले होते. औरंगाबादच्या नामांतराला आम्ही विरोध केला नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले होते. सत्तेसाठी गठबंधन केले तेव्हा नामांतराचा मुद्दा पुढे येऊ शकतो, असे लक्षात आले नव्हते का? असा सवालही जलील यांनी उपस्थित केला.

चौकट …..
हिंदू-मुस्लिम असा रंग देऊ नका…
अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात कधीही भाजपमध्ये जाऊ शकतात. फक्त औपचारिकता राहिलेली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रामध्ये काही खरे नाही, असे त्यांना वाटत आहे. औरंगाबाद किंवा संभाजीनगर या निर्णयाला हिंदू-मुस्लिम असा रंग देऊ नका. या प्रकरणाला जातीय रंग देण्याची गरज नाही, असेही एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या