29.9 C
Latur
Tuesday, March 21, 2023
Homeमहाराष्ट्रकमला नगरच्या झोपडपट्टीमध्ये भीषण आग

कमला नगरच्या झोपडपट्टीमध्ये भीषण आग

एकमत ऑनलाईन

मुंबई : धारावी-शाहूनगर परिसरात असलेल्या कमला नगरच्या झोपडपट्टीमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शाहूनगर परिसरातील २५ हून अधिक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहेत. अजूनही आग धुमसताना दिसत आहे. आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

मुंबईच्या शाहूनगर परिसरात असणा-या कमला नगरच्या झोपडपट्टीमध्ये पहाटे ४ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये २५ पेक्षा जास्त घरे जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परिसरात सध्या फायर कुलिंगचे काम सुरू आहे.

ही आग इतकी भीषण होती की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी २० ते २५ हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.

पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागली होती. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या