24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रकरात तुटपुंजी कपात का?

करात तुटपुंजी कपात का?

एकमत ऑनलाईन

सत्तेत आल्यावर भूमिका बदलली, अजित पवार यांचा हल्लाबोल
पुणे : महाविकास आघाडी सरकारकडे ५० टक्के करकपातीची मागणी करत होतात. आता सत्तेत आल्यानंतर तटपुंजी कपात का केली, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पेट्रोल-डिझेल दरावरून उपस्थित केला.

ते पुण्यात बोलत होते. शिंदे सरकारकडून गुरुवारी राज्यातील पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रतिलिटर आणि डिझेलच्या करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दरावरुन अजित पवार यांनी सत्ताधा-यांना जाब विचारला.

पेट्रोल आणि डिझेलवरील काही प्रमाणात टॅक्स कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी अडीच वर्ष अर्थमंत्री राहिलो. मागील अर्थसंकल्पात गॅसच्या किमती प्रचंड प्रमाणात कमी केल्या होत्या. साडेतेरा टक्केंचा टॅक्स तीन टक्क्यांवर आणला होता. यामुळे हजार कोटींचा भार राज्य सरकारने उचलला होता. त्यावेळी विरोधी पक्षात असणारे हे लोक राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलला जितका टॅक्स लावते, ते ५० टक्के करा, अशी मागणी करत होते, आता सत्तेत आल्यानंतर त्यांनी 50 टक्के टॅक्स कमी का नाही केला, जर ५० टक्के कर कपात केली असती तर डिझेलची किंमत ११ रुपये आणि पेट्रोलची किंमत १७ रुपयांनी कमी झाली असती. पण त्यांनी तसे केलेच नाही. विरोधात असताना मागणी करायची अन् निर्णय घेण्याची वेळ आल्यावर पळवाट काढायची.

आज तीन आणि पाच रुपयांने किंमत कमी केली आहे. पण पुढील काही दिवसांत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल सातत्याने वाढवतेच. गॅस सिलिंडर वाढवतेच. त्यामुळे सर्वसामान्यांना झळ बसत आहे. आपण इतका टॅक्स कमी करुनदेखील सीएनजीचे दर केंद्राने वाढविले,असा आरोपही त्यांनी केला.

शिंदे-फडणवीस राज्याचे मालक
रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे महाराष्ट्राचे मालक झाले आहेत, हे दोघेच सगळे निर्णय घेत आहेत, अशा शब्दांत अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले.

ही जनतेची फसवणूकच : थोरात
राज्य सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकाच्या या निर्णयावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. पेट्रोल-डिझेलची दर कपात ही केवळ जनतेची फसवणूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यांनी डिझेल आणि पेट्रोलचे दर कमी केले. मात्र, दुस-या बाजूने विजेचे दर २० टक्क्याने वाढवले. एका बाजूने दिलासा द्यायचा आणि दुस-या बाजूने जाणीवपूर्वक लोकांच्या खिशातून पैसा काढून घ्यायचा, अशी यांची निती आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या