26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रकार अपघातात चौघा मित्रांचा मृत्यू

कार अपघातात चौघा मित्रांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

गोंदिया : गोंदियामध्ये रस्ते अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. कारवरील ताबा सुटल्यामुळे भीषण अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्याअंतर्गत येणा-या खोबा गावाजवळ काल रात्री हा अपघात झाला. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून हे चारही तरुण गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील आहेत. आमगाव तालुक्यातील पाच तरुण नवेगाव बांध येथे सोलर पंप फिटिंग करण्यासाठी एका चारचाकी वाहनाने गेले होते. सोलर फिटिंगचे काम आटोपून हे पाच तरुण रात्री परत येत असताना अचानक गाडी अनियंत्रित झाली.
गाडी रस्त्याच्या खाली आपटून चक्काचूर झाली.

या पाच तरुणांपैकी चार तरुणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. या अपघातातील २४ वर्षीय प्रदीप बिसेन हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये २४ वर्षीय रामकृष्ण बिसेन, २४ वर्षीय सचिन कटरे, १८ वर्षीय संदीप सोनवाने, २७ वर्षीय निलेश तुरकर यांचा समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या