स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपशी एकजुटीने लढणार
शिर्डीच्या कार्यशाळेत मंथन
मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसा राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एक मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आघाडी करण्यास तयार आहे. काँग्रेसच्या आज शिर्डीच्या कार्यशाळेत याबाबत निर्णय घेण्यात आला.
विशेष म्हणजे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वॉर्डनिहाय आरक्षणावरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात आज तणाव निर्माण झाल्याचे चित्र होते. पण हे चित्र फार काळ टिकणार नाही. कारण काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आघाडी करायला तयार आहे. काँग्रेसच्या या निर्णयाला राष्ट्रवादी आणि शिवसेनेने पाठिंबा दिला तर भाजपपुढील आव्हाने वाढण्याची शक्यता आहे. कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरोधात भाजप असे चित्र दिसेल.