कोल्हापूर : जिल्ह्यात २९ एप्रिलपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार पाच किंवा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असेल. तसेच जमाव करणे, मिरवणुका व सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या यात्रा, जत्रा किंवा उरुसांमध्ये मोबाईलद्वारे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होऊन तसेच आक्षेपार्ह स्टेटस ठेवून तेढ निर्माण होऊ नये, यासाठी अप्पर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी हे बंदी आदेश दिले आहेत.