22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रखा. राऊतच पत्राचाळ घोटाळ्याचे मास्टरमाईंड

खा. राऊतच पत्राचाळ घोटाळ्याचे मास्टरमाईंड

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ््यातील मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. पत्राचाळ प्रकरणात राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांनी संगनमताने मनी लाँड्रिंग केल्याचा आरोपही ईडीने आरोपपत्रात केला.

प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे विश्वासू होते, म्हणून त्यांना गुरु आशिष कंपनीत आणण्यात आले. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे जवळचे मित्र असल्याने या प्रकल्पात तेही गुंतले होते. प्रवीण राऊत यांच्याकडे कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार होते. त्यांना म्हाडाशी वाटाघाटी करण्याचे आणि सर्व सरकारी, निमशासकीय, वैधानिक आणि स्थानिक प्राधिकरणांशी संपर्क साधण्याचे काम सोपविण्यात आले होते.

संजय राऊत यांच्याशी जवळीक असल्याने प्रवीण राऊत यांनी म्हाडाच्या बहुतांश सरकारी अधिका-यांशी विविध फायदे मिळवण्यासाठी स्वत: संपर्क साधला. नंतर एफएसआय बिल्डरला विकला. या प्रकरणात राकेश वाधवान, प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांचे आपसात संगनमत होते. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत प्रवीण राऊत यांचा २५ टक्के हिस्सा होता. तरीही यात प्रवीण राऊत हे फक्त एक चेहरा होते. हे सर्व काही संजय राऊत यांच्या नियंत्रणाखाली झाले असल्याचे ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

राऊतांच्या कोठडीत वाढ
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली असून, त्यांना ४ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. ४ दिवसांपूर्वीच त्यांच्या विरोधात इडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या