26.9 C
Latur
Sunday, May 29, 2022
Homeमहाराष्ट्रगर्भवती वनरक्षक महिलेस माजी सरपंचाकडून मारहाण

गर्भवती वनरक्षक महिलेस माजी सरपंचाकडून मारहाण

एकमत ऑनलाईन

सातारा : येथील पळसवडे गावच्या माजी सरपंचाने वनरक्षक महिला कर्मचा-यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. वनविभागाच्या महिला कर्मचारी या तीन महिन्यांच्या गर्भवती असून, त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. या घडलेल्या प्रकाराची तक्रार सातारा पोलिस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती स्वत: या कर्मचा-याने दिली.

पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि सूर्याजी ठोंबरे यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सातारा तालुक्यातील पळसवडे येथे हा प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या वनरक्षक महिलेला मारहाण झाली, त्या तीन महिन्यांच्या गर्भवती आहेत. मला न विचारता वन मजूर दुसरीकडे का नेले, या कारणाने चिडून जाऊन वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी ही मारहाण केली आहे. मारहाण करणा-या सरपंच आरोपी रामदास जानकर याच्यावर ३५३ , ३३२, ५०४, ५०६, ३४ या कलमांनुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

असली कृत्ये खपवून घेणार नाही : आदित्य ठाकरे
माजी पुरुष सरपंचाकडून तीन महिन्यांच्या गर्भवती महिला वनरक्षकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची गंभीर घटना महाराष्ट्रातील साता-यातील पळसवडे इथे घडली होती. या घटनेची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. कायद्याला कठोरपणे सामोरे जावे लागेल. अशी कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या