29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeमहाराष्ट्रगुलाबराव पाटलांची गाडी अडविण्याचा प्रयत्न

गुलाबराव पाटलांची गाडी अडविण्याचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

५० खोके, एकदम ओकेची जोरदार घोषणाबाजी
धुळे : शिवसेनेच्या ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाऊन भाजपाशी युती केली, सरकारही विराजमान झाले. अनेकांना मंत्रिपदंही मिळाली. मात्र, या नेत्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. धुळ््यात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची गाडी शिवसैनिकांनी अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी ५० खोके-गद्दार ओके अशी जोरदार घोषणाबाजीही शिवसैनिकांनी केली.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मंत्री झाल्यानंतर आज प्रथमच धुळे दौ-यावर आले होते. शिंदे गटाचा बीकेसी मैदानावर होणा-या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आज सायंकाळी धुळे शहरातील सैनिक लॉन्स येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मंत्री गुलाबराव पाटील अमळनेर मार्गे धुळ््याकडे येत असताना पारोळा चौफुल्यावर शिवसैनिकांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना ५० खोके एकदम ओक्के लिहिलेले फलक दाखवत निदर्शने करण्याचा प्रयत्न केला.

शिवसैनिकांनी हे आंदोलन अचानक केल्यामुळे पोलिसांची काही वेळ चांगलीच तारांबळ उडाली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळावर जाऊन शिवसैनिकांना ताब्यात घेतले. अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन शिवसैनिकांना ताब्यात घेतले. यावेळी काही वेळ कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे बघायला मिळाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या