28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमहाराष्ट्रचंद्रकांत पाटील यांनी केली आई-वडिलांची तुलना मोदी-शहांशी

चंद्रकांत पाटील यांनी केली आई-वडिलांची तुलना मोदी-शहांशी

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पालकमंत्री पदावर निवड झाल्यावर पुण्यामध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत एक वक्तव्य केले होते.यामध्ये ते म्हणाले होते की, मोदी आणि शाह यांना शिव्या घातलेल्या मला चालणार नाही. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी आणि शहांना शिव्या दिलेल्या चालणार नाही असे ते म्हणाले होते. यावर आज चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

मोदी, शाह हे राजकारणी आहेत. त्यांची आई-वडिलांशी तुलना करणे अत्यंत चुकीचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आई-वडिलांना शिव्या द्या पण मोदी शाह यांना शिव्या दिल्या तर सहन करु शकत नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांचे हे वक्तव्य चुकीचे असल्याचे जयंत पाटील म्हणाले. मराठी माणसे असे कधीही करत नसल्याचे पाटील म्हणाले.

धनुष्यबाण उद्धव ठाकरेंचेच
दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या सभेने खरी शिवसेना कोणाची आहे हे सप्ष्ट झाले असल्याचे जयंत पाटील म्हणाले. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचे म्हणजेच उद्धव ठाकरे यांचे आहे. जर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्ह दिले तर त्यांच्या कृतीबाबत आश्चर्य व्यक्त केले जाईल असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. शिंदे गटाकडून सभेसाठी एवढा खर्च करण्यात आला. लोकांना कोंबून मुंबईला आणले होते. त्यांना माहिती देखील नव्हती. याची चौकशी व्हायला हवी असेही जयंत पाटील म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या