22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रचाचणीवरून संभ्रम

चाचणीवरून संभ्रम

एकमत ऑनलाईन

मुंबई : ओमायक्रॉन कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता महाराष्ट्रात पुन्हा एकदा नियमावली जाहीर झाली आहे. मात्र, मंत्रालयातून जारी केलेल्या परिपत्रकात कोरोना चाचणी बंधनकारक असल्याचे म्हटले, तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इतर राज्यांमधून महाराष्ट्रात येणा-या स्थानिक प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक नसल्याचे म्हटले. त्यामुळे मंत्री आणि प्रशासनाच्या पातळीवर एकवाक्यता नसल्याचे समोर आले आहे. त्यातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेदेखील महाराष्ट्रातील आरोग्य विभागाला यावरून फटकारले आहे.
यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, त्याच राज्य सरकारने घेतल्या आहेत. जर कुणी स्थानिक प्रवासी असेल, तर त्याला २ कोरोना लसी घेतलेल्या असल्यास प्रवास करता येणार आहे.

लस घेतलेल्या रुग्णांना आरटीपीसीआर चाचणीची गरज नसेल. अतिधोक्याच्या देशातून आलेल्या प्रवाशांची १०-१५ दिवसांचा प्रवास तपशील तपासला जाईल. ते परदेशातून आले असतील, तर त्यांना आरटीपीसीआर चाचणी, ७ दिवसांचे अलगीकरण बंधनकारक आहे. त्यानंतर त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्यास ते प्रवासी आपल्या कामाला जाऊ शकतात, असा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे, असे म्हटले.

दुसरीकडे राज्य मदत आणि पुनर्वसन विभागाच्या मुख्य सचिवांनी हवाई प्रवास आणि राज्यात कोरोनाबाबत ७ नियम जारी केले आहेत. यात एक नियम महाराष्ट्राबाहेरून येणा-या प्रवाशांसाठीचा आहे. यानुसार बाहेर राज्यातून महाराष्ट्रात येणा-या प्रवाशांना ४८ तासांत केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक असणार आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या