Saturday, September 23, 2023

जायकवाडी धरणातील पाण्याची आवक बंद

छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पाऊस आणि जायकवाडी धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु झाली होती. त्यामुळे पाणीसाठ्यात देखील वाढ होताना पाहायला मिळत होती. मात्र, पुन्हा पावसाने खंड दिल्याने जायकवाडी धरणात येणारी आवक देखील बंद झाली आहे

. आज सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरणात सध्या पाण्याची आवक पूर्णपणे बंद झाली आहे. तर, दुसरीकडे उजव्या कालव्यात ९०० क्युसेक आणि डाव्या कालव्यात १२०० क्युसेकने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

यंदा मान्सून उशिरा दाखल झाला. त्यात ऑगस्ट महिना कोरडा गेला. त्यामुळे यंदा मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. अनेक भागात सध्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, अशा ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातच आता सप्टेंबर महिना अर्धा संपला आहे. त्यामुळे पावसाचे अंदाज २० दिवस उरले आहेत. अशात जर जोरदार पाऊस झाला नाही, तर प्रश्न अधिकच गंभीर बनण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी तर पिके करपून गेली आहे. त्यामुळे उरलेल्या पिकांना वाचवण्यासाठी शेतक-यांची धरपड पाहायला मिळत आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या