22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रज्योती मेटेंना आमदार करा; संभाजीराजेंची मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

ज्योती मेटेंना आमदार करा; संभाजीराजेंची मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

एकमत ऑनलाईन

सातारा : शिवसंग्रामला राजकीय वर्तुळात ताकद देण्यासाठी विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना आमदार करा, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. संभाजीराजे यांनी विनायक मेटे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

यावेळी संभाजीराजेंनी विनायक मेटे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या कामाच्या आठवणीला उजाळाही दिला. मी सदैव मेटे कुटुंबियांच्या सोबत असून विनायक मेटे यांचा अपूर्ण राहिलेला मराठा आरक्षणाचा लढा पुढे घेऊन जाणार असल्याचे संभाजीराजे यांनी कुटुंबीयांसोबत चर्चा करताना सांगितले आहे.

विनायक मेटे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी संभाजीराजे मेटे यांच्या घरामध्ये दाखल होताच त्यांच्या बहिणीला अश्रु अनावर झाले. माझ्या भावाने मराठा आरक्षणासाठी आयुष्य खर्ची घातले. त्याचा लढा आता तुम्ही पुढे चालू ठेवा, अशी भावनिक सादही यावेळी विनायक मेटे यांच्या बहिणीने संभाजीराजे यांना घातली आहे.

यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेला राजकीय ताकद देण्यासाठी त्यांच्या पत्नीला तात्काळ आमदार करण्यात यावं. मेंटेनी मराठा समाजासाठी, मराठा आरक्षणासाठी आणि शिवस्मारकासाठी आयुष्यभर काम केलं आणि त्यांचे हेच काम आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या