24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्र‘टीईटी’ घोटाळा : सरकारने थांबवले वेतन; शिक्षक कोर्टात

‘टीईटी’ घोटाळा : सरकारने थांबवले वेतन; शिक्षक कोर्टात

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) घोटाळाप्रकरणी १४ सहशिक्षकांचे वेतन थांबवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यांतील तीन शिक्षकांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेतली आहे. सन २०१९ मध्ये हा गैरप्रकार घडला होता.

या घोटाळ्यात नाव आलेल्या १४ सहशिक्षकांच्या शाळांतील मुख्याध्यापकांना वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकांनी वेतन रोखण्याचे आदेश दिले होते. यामुळे शिक्षकांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

घोटाळा झालेल्या यादीत लातूर जिल्ह्यातील ११ शाळांतील १४ कर्मचा-यांमध्ये शिक्षण सेवक, सहशिक्षकांचा समावेश असून हे शालार्थ प्रणालीद्वारे वेतन अनुदान घेत आहेत. या १४ शिक्षकांचे शालार्थ आयडी पुढील आदेश येईपर्यंत गोठवण्यात आले आहेत.

टीईटी घोटाळा काय आहे?
सन २०१९-२० मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा घेण्यात आली होती. या प्रकरणी घोटाळा झाल्याचे समोर येताच पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या घोटाळ्यात ७ हजार ८८० उमेदवारांना बोगस प्रमाणपत्र देण्यात आल्याचे उघड झाले होते. या प्रमाणपत्रांमुळे ते शिक्षक बनले होते. या बोगस शिक्षकांची यादी नुकतीच परीक्षा परिषदेने जाहीर केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या