28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रतातडीने सुनावणीस नकार

तातडीने सुनावणीस नकार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी आज पुन्हा शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली. मात्र, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. नियोजित वेळापत्रकानुसार २२ ऑगस्ट रोजीच या प्रकरणावर सुनावणी होईल, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.

शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचे सांगत धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. यासाठी शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील सुनावणी १९ ऑगस्ट रोजी शुक्रवारी होणार आहे. यावर ठाकरे गटाने चिंता व्यक्त केली. तसेच निवडणूक आयोगाचा निर्णय आपल्याविरोधात लागण्याची भीतीदेखील ठाकरे गटाला आहे. त्यामुळे या प्रकरणावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती आज ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात केली.

घटनापीठामुळे विलंब
या प्रकरणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी तातडीने सुनावणीस नकार दिला. राज्यातील सत्तासंघर्षाबाबतची सुनावणी आणखी मोठ्या घटनापीठाकडे द्यायची की नाही, हे ठरवायचे आहे. त्यामुळे सुनावणीस विलंब होत आहे. याबाबत आम्ही आदेश देऊ, असे सांगत रमणा यांनी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.

भीती निरर्थक
राज्याच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय देऊ नये, असे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिले आहेत. याबाबत अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केंद्रीय निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असली तरी आयोगाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळावे लागतील. त्यामुळे येत्या शुक्रवारी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत काही निर्णय देईल, ही भीती निरर्थक आहे, असे म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या