23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीसांचा ‘मध्यप्रदेश पॅटर्न’

देवेंद्र फडणवीसांचा ‘मध्यप्रदेश पॅटर्न’

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदेंचे सरकार सत्तेत आले आहे. आता शिंदे मंत्रिमंडळाच्या रचनेबाबत चर्चा सुरू आहे.

भाजपने यापूर्वी मध्य प्रदेशातही पुन्हा सत्ता मिळवली, त्यावेळी वापरलेला शिवराजसिंह चौहान मंत्रिमंडळ रचनेचा फॉर्म्यूला भाजप श्रेष्ठी महाराष्ट्रातही वापरू शकतात. आगामी २-३ दिवसांत याचेही चित्र स्पष्ट होईल. ‘सत्ता मिलने के बाद बांटने जैसा बहोत कुछ होता है,‘ हे दिवंगत सुषमा स्वराज यांचे वचन भाजपमध्ये प्रसिध्द आहेच.

देवेंद्र फडणवीस मंगळवारी (ता. २८) दिल्लीत आले होते, तेव्हा त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही मंत्रिमंडळ रचनेवर चर्चा केली होती.टीम फडणवीसची रचना करताना भाजप नेतृत्वासमोर यंदाची मुंबई महापालिका निवडणूक व २०२४ ची लोकसभा, असे दुहेरी लक्ष््य आहे. मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातून हिसकावून घेण्यास भाजपसाठी सध्याचा काळ प्रचंड अनुकूल आहे.

दरम्यान, शिंदे मंत्रिमंडळाची रचना करताना भाजप मध्यप्रदेशच्या मार्गाने हे स्पष्ट आहे. ज्योतिरादित्य शिंदे कॉँग्रेसमधून बाहेर पडल्यावर पुन्हा शिवराजसिंह मंत्रिमंडळाची रचना करताना भाजपने बंडखोर गटाच्या ५ ते ६ आमदारांमागे एकाला मंत्रीपद हे सूत्र ठेवले होते. महाराष्ट्रात गृहखात्यासह भाजप स्वत:कडे २९ मंत्रीपदे ठेवण्याची शक्यता आहे. बंडखोर गटाचे ४८ आमदार गृहित धरले तर त्यांना किमान ८ मंत्रीपदे निश्चित मिळू शकतात. यातील दोन ते तीन कॅबीनेट व अन्य राज्यमंत्रीपदे असू शकतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्यांना मंत्रिपदे मिळाली नव्हती, त्यांची मंत्रीपदी प्राधान्याने वर्णी लावण्याकडे शिंदे यांचा कल असणार हे उघड आहे.

महाराष्ट्रातील सरकार किमान अडीच वर्षे भक्कमपणे टिकावे यादृष्टीनेच भाजप हायकमांड फडणवीस मंत्रिमंडळाची रचना करीत आहे. २८८ सदस्यांच्या विधानसभेत बंडखोर शिवसेना गटासह भाजपकडे सध्या पूर्ण बहुमत आहे. भाजपचे १०६, अपक्ष १२, मनसेचा १ व शिंदे गटाचे किमान ३९ सदस्य धरता भाजप आघाडीचे संख्याबळ किमान १६१ वर जाते. बहुमताच्या शक्तीपरीक्षेत शिंदे गट गैरहजर राहिल्यास बहुमताचा आकडा १२४ वर घसरेल ते भाजपसाठी आणखी फायदेशीर ठरेल.

शिवसेनेचे संसदेतील (लोकसभा) १८ पैकी किमान १२ ते १३ खासदार शिंदे यांच्या ‘बाळासाहेब ठाकरे शिवसेना’ या गटाबरोबर आजच असल्याचे सांगितले जाते. शिंदे यांचे पुत्र व लोकसभेतील अभ्यासू खासदार म्हणून ओळखले जाणारे डॉ. श्रीकांत शिंदे यांनाही आगामी काळात केंद्रीय राज्यमंत्रीपदाचे ‘योग’ आहेत. या शिंदेनिष्ठ गटाची आसनव्यवस्था वेगळी करावी लागेल काय, या दृष्टीने चाचपणीही सुरू झाल्याचे समजते. जर राज्य विधानसभेत एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता मिळाली, तर सेनेचे संसदीय कार्यालय तर शिंदे गटाच्या ताब्यात येईलच, पण निवडक खासदार वगळता अन्य सेना खासदारही पहिल्या फटक्यात शिंदे गटाचा हात धरतील अशी चिन्हे आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या