24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडे समर्थकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पंकजा मुंडे समर्थकाचा आत्महत्येचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

पाथर्डी : माजी मंत्री व भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी न दिल्याने पाथर्डी येथील कट्टर मुंडे समर्थकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. मुकुंद गर्जे असे या पंकजा मुंडे समर्थकाचे नाव आहे. त्यांनी रोगर हे किटकनाशक औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पंकजा मुंडे यांना सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून डावलले जात असल्याचा आरोप या समर्थकाने केला.

आत्महत्येचा प्रयत्न करणा-या मुंडे समर्थक मुकुंद गर्जे यांना उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृतीला पुढील धोका पाहता त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांना राजकारणात सातत्याने स्वत:च्याच पक्षाकडून डावलले जात असल्याने विष प्राशन केल्याचे समर्थक मुकुंद गर्जे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे औरंगाबादेतही त्यांच्या समर्थकांनी भाजपच्या औरंगाबाद कार्यालयासमोर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच संताप अनावर झाल्याने मोडतोड केल्याचेही समजते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या