23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रपीककर्जावरील अनुदान, घोषणा अडीच वर्षांपूर्वीची, अनुदान मिळालेच नाही

पीककर्जावरील अनुदान, घोषणा अडीच वर्षांपूर्वीची, अनुदान मिळालेच नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : पीककर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची गोंडस घोषणा सुमारे अडीच वर्षांपूर्वी राज्य सरकारने केली. या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी पात्र शेतक-यांच्या याद्याही तात्काळ मागविण्यात आल्या. परंतु पीककर्जाची दिलेल्या मुदतीत नियमितपणे परतफेड करूनही अद्याप एका पैशाचेही प्रोत्साहन अनुदान मिळू शकले नाही. या अनुदानासाठी मागील अडीच वर्षांपासून सातत्याने खोडा घातला जात आहे. आता तरी यावर ठोस निर्णय घेऊन शेतक-यांना थेट मदत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

नियमित कर्ज परतफेड करणा-या सर्व शेतक-यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा अडीच वर्षापूर्वी झाली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही घोषणा झाली. त्यामुळे पीककर्जाची नियमित परतफेड करणा-यांनाही आर्थिक लाभ होईल, अशी शेतक-यांना आशा होती. विशेष म्हणजे तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी जुलै महिन्याच्या १ तारखेपासून हा लाभ द्यायला सुरुवात केली होती. मात्र, अचानक झालेले सत्तांतर आणि त्याबद्दल असलेली निराशा यामुळे या योजनेला शिंदे सरकारने स्थगिती दिली. मात्र, ही योजना पुढे नेण्याची घोषणाही करण्यात आली. परंतु अद्याप त्याबाबतची कार्यवाही सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतक-यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरवर्षी नियमितपणे व्याजासह पीककर्जाची परतफेड केल्याने प्रोत्साहन अनुदान मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु ही अपेक्षा फोल ठरली आहे. ही योजना केवळ कागदावरच राहिली असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर २०१९ मध्ये या प्रोत्साहन अनुदान योजनेची घोषणा केली होती. या घोषणेनुसार जानेवारी २०२० मध्ये यासाठी पात्र शेतक-यांच्या याद्या मागविण्यात आल्या होत्या. परंतु हे काम चालू असतानाच राज्यावर कोरोनाचे संकट आले आणि ही योजना जैसे थे अवस्थेत तशीच मागे पडली. दरम्यान, राज्य सरकारने २७ जून २०२२ ला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा या योजनेच्या अंमलबजावणीची घोषणा केली. या नव्या घोषणेनंतर पुन्हा एकदा पात्र शेतक-यांच्या याद्या मागविण्यात आल्या.

शेतक-यांच्या नशिबी प्रतीक्षाच
शेतक-यांना कोणत्या ना कोणत्या मदतीसाठी सातत्याने प्रतीक्षा करावी लागते. नियमित पीककर्ज परतफेड करणा-यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय होऊनही अडीच वर्षे झाली, तरी अद्याप अनुदानाचा लाभ मिळू शकला नाही. त्यामुळे यासाठीही शेतक-यांना अजून प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे शेतक-यांत अस्वस्थता आहे.

पात्र शेतक-यांच्या याद्या मागविल्या
या प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० ही तीन वर्षे पीककर्जाची नियमित परतफेड करणारÞे सर्व शेतकरी पात्र असणार आहेत. चालू आर्थिक वर्षात (२०२२-२३) या योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचा अध्यादेश २९ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार पुन्हा एकदा पात्र शेतक-यांच्या याद्या मागविण्यास सुरुवात केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या