24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यातील भिडे पूल पाण्याखाली

पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली

एकमत ऑनलाईन

पंचगंगा, कृष्णेला पूर, मुंबई, कोकण, विदर्भातही मुसळधार
मुंबई : राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणे तुडुंब भरत आली असून, शहरातून वाहणा-या मुठा नदीला पूर आला आहे. त्यामुळे शहरातील नदीपात्रातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात पंचगंगा, कृष्णेला पूर आला असून, पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. याशिवाय मुंबईसह विदर्भात मुसळधार सुरू आहे. त्यामुळे सर्व नद्या ओसंडून वाहात आहेत. मराठवाड्यात काही भागांत पाऊस सुरू आहे. मात्र, लातूरसह ब-याच भागात तूर्त पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे काही भागाला दिलासा मिळाला आहे.

मुंबईत गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरु आहे. या दरम्यान गेल्या दोन दिवसात मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रचंड मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला. नागरिकांचे हाल झाले. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम असून, पंचगंगा, कृष्णेला पूर आला आहे. पंचगंगेने तर धोक्याची पातळी ओलांडली आहे. पश्चिम महाराष्ट्रासोबत मुंबई, ठाणे, पुण्यात आता पावसाची बॅटिंग सुरु आहे. पुण्यात मुठा नदीला पूर आला आहे. नदी पात्रातील भिडे पुलावर तर पाणीच पाणी जमा झाले आहे. त्यामुळे पुलावरील अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. या गाड्या पाण्याबाहेर काढण्यासाठी नागरिकांकडून प्रयत्नांची पराकाष्टा सुरु आहेत. अनेकांकडून दोर बांधून वाहन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून मुठा नदी पात्रात सुरू असणारा विसर्ग वाढवून संध्याकाळी ६ वा. २६ हजार ८०९ क्यूसेक्स करण्यात आला. प्रशासन पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असेही सांगण्यात आले आहे.

खडकवासला ओव्हरफ्लो
पुण्यातील खडकवासला धरण ओव्हरफ्लो झाले आहे. खडकवासाला धरणामध्ये पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणातून आज संध्याकाळी २६ हजार ८०९ क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. मुसळधार पावसामुळे मुठा नदीला पूर आला. विशेष म्हणजे पूर आल्याने नदी पात्रातील भिडे पूलही पाण्याखाली गेला. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या