पुणे : पेट्रोल-डिझेलच्या सततच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे आधीच कंबरडे मोडले आहे. जीवनावश्यक गोष्टींच्या दरांनी सामांन्यांचे बजेट बिघडले आहे. यातच आता आणखी एक झटका सहन करावा लागणार आहे. पुणेकरांसाठी ही मोठी झळ आहे. कारण इंधनाच्या दरवाढीमुळे आता रिक्षा भाडेवाड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना आता रिक्षाने प्रवास करण्यासाठी थोडा जास्त खिसा खाली करावा लागणार आहे.
इंधन दरवाढीच्या सततच्या किमतींनी हैराण झालेला पुणेकर या बातमीने आणखी दु:ख झाले आहे. कारण इंधनाचे दर वाढल्याने सर्वच वस्तूंचे दर वाढत आहेत. सध्या बटाटे, कांदा, टोमॅटोचे भावही गगनाला भिडले आहेत. जीएसटीने त्यात आणखी भर घातली. अशा स्थितीत वाढत्या महागाईत सामान्य माणसाने भाकरी कशी खायची किंवा मुलांचे संगोपन कसे करायचे आणि भविष्यासाठी दोन पैसे कसे वाचवायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातही कसाबसा संसाराचा गाडा हाकणा-या पुणेकरांना ही भाडेवाड जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया पुणेकर देत आहे.