पुणे : सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर महाराष्ट्रात अनेक घडामोडींना वेग आला.
एकनाथ शिंदेंनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील शिवसेनेला खिंडार पडले असल्याची माहिती मिळत आहे
.
पुण्यातील शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची माहिती आहे. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी नाना भानगिरे यांच्याकडे असणार आहे.
याशिवाय २०१७ साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले पुण्यातील ५ नगरसेवकही एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत भानगिरे यांनी हडपसर विधानसभा निवडणूक तीन वेळा लढवली आहे. याशिवाय पुणे महानगर पालिकेतून शिवसेनेकडून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडुन आले आहेत.