मुंबई : सध्या राज्यात काही ठिकाणी पाऊस पडत आहेत. तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कामय आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाऊस नसल्यामुळं पेरण्या रखडल्या आहेत. दरम्यान, मुंबईसह उपनगरात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे.
या पावसामुळं मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडं पुणे जिल्ह्यातही पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात चांगलाच पाऊस झाला आहे. पाणी कपातीचं संकट दूर करण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं चांगली हजेरी लावली आहे.
दरम्यान, राज्याच्या काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.मात्र, राज्यातील इतर भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पेरणीसाठी शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकीकडं हवामान खात्याकडून भाकितांचा पाऊस पडतोय, तर दुसरीकडं राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाअभावी पेरणी रखडली आहे.
मान्सूननं महाराष्ट्र व्यापल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं असलं तरी प्रत्यक्षात राज्यभरात पावसाची प्रतीक्षा आहे. पावसानं दडी मारल्यानं शेतक-यांना पेरणीची तिफण गोठ्यातच ठेवावी लागली आहे.
नाशिक जिल्ह्यात केवळ ०८ टक्के पेरणी
नाशिक शहरात पावसाने समाधानकारक हजेरी लावली असली तर जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये पावसाने हुलकावणी दिली आहे. पावसाअभावी जिल्ह्यात आतापर्यंत ०८ टक्केच पेरण्या झाल्या असून, अनेक भागांत पेरण्या रखडल्याचे चित्र आहे.