29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रप्रश्न विचारायला अक्कल लागत नाही

प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर सातत्याने टीका करणा-या भाजप नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. अनेकजण जरासे काही झाले की, महानगरपालिका आणि नगरेसवकांवर खापर फोडतात. सातत्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. पण फक्त प्रश्न विचारायला फार अकलेची गरज नसते. तुम्ही काय करता, हेदेखील सांगावे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. शुक्रवारी मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेच्या लोकार्पण सोहळयावेळी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर नाव न घेता टीका केली. अनेकजण निवडणूकीत मते मागताना जनतेसमोर झुकलेले असतात. पण निवडणुका झाल्यावर ते ताठ होतात. मुंबई महापालिकेने जनतेला ८० हून अधिक सुविधा घरबसल्या दिल्या. देशातील अशाप्रकारची एकमेव महापालिका,असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीतील आपल्या सहका-यांचे कौतुक केले. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हा निर्णय माझ्या नेतृत्त्वाखाली झाला, असे म्हणतात. माझे साथीदार खंबीर आहेत, खांद्याला खांदा लावून साथ देत आहेत, असेही ठाकरे यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या