25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रबहिणीने लग्नासाठी जमविलेल्या पैशांवर भावाचा डल्ला

बहिणीने लग्नासाठी जमविलेल्या पैशांवर भावाचा डल्ला

एकमत ऑनलाईन

मुंबई : बहिणीच्या लग्नासाठी जमवलेल्या रोख रक्कम आणि दागिन्यावर सख्या भावानेच डल्ला मारल्याची घटना मिरा रोडमध्ये घडली आहे. आपल्या सख्ख्या बहिणीच्या घरी भावाने २६ लाखाची चोरी केली. फरमान जावेद खान असे या आरोपीचे नाव असून त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्याला गुजरातच्या वलसाड येथून अटक करण्यात आली.

मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिटने १ ने फरमान जावेद खानला अटक केली आहे. फरमानने आपल्याच सख्ख्या बहिणीच्या घरी चोरी करून बहीण-भावाच्या नात्यालाच काळिमा फासली आहे. फिर्यादी तरुन्नुन जावेद खान ही मिरा रोडला राहते. तिने आपल्या छोट्या बहिणीच्या लग्नासाठी घरात २५ लाखाची रोख रक्कम आणि १.२० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच ४० हजार किमतीचे कानातील झुमके असे किमती सामान घरी ठेवले होते. ४ नोव्हेंबर रोजी फरमानची बहीण आणि कुटुंबातील सदस्य लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेले होते. मात्र, त्या लग्नाला फरमान आजारी असल्याचे कारण सांगून गेला नाही.

रात्री ९ ते १२ च्या दरम्यान तरुन्नुम खान यांच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने मिळून २६ लाख ६० हजाराची चोरी झाली होती. पोलिसांच्या पथकाला घटनास्थळाची पाहणी करुन आणि तांत्रिक गोष्टीच्या आधारावरुन फरहानवर संशय आला. मात्र पेशाने रिक्षाचालक असणारा फरहान या घटनेनंतर आपली पत्नी, मुलगा आणि मेहुणीला घेवून फरार झाल्याचे समजले.

पोलिसांच्या तपास यंत्रणेला आरोपी गुजरातला पळून गेल्याचे कळल्यावर वेगवेगळ््या टीम तयार करुन, गुन्हे शाखा १ च्या युनिटने फरमानला गुजरातच्या वलसाड येथून अटक केली.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या