22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रबुलेट ट्रेनसाठी भूसंपादन महिनाभरात पूर्ण करा

बुलेट ट्रेनसाठी भूसंपादन महिनाभरात पूर्ण करा

एकमत ऑनलाईन

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेले अडीच वर्ष रखडलेल्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या कामाला गती देण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले आहे. भूसंपादनाची कारवाई, शेतक-यांना मोबदला देणे, जागा हस्तांतरण करणे हे विषय येत्या महिनाभरात म्हणजे ३० सप्टेंबरपूर्वी मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पुणे-नाशिक सेमी हायस्पिड रेल्वे मार्गाला निती आयोगाने मान्यता दिली असून केंद्राच्या अर्थविषयक व्यवहार मंत्रिमंडळ समितीची मान्यता बाकी आहे. या प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन, शासकीय आणि वन जमिनीचे हस्तांरण या बाबींना गती देण्याची सूचनाही त्यांनी केली. राज्यातील रेल्वे, मेट्रो, मल्टीमोडल कॉरिडॉर, तुळजापूर, पंढरपूर अशा काही पायाभूत सुविधा प्रकल्पांचा एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर संबंधित विभागांनी काम करावे. तसेच प्रलंबित बाबी, आवश्यक परवानग्या या तातडीने मिळवून घ्याव्यात. प्रकल्प रेंगाळल्यास त्याचा खर्चही वाढतो, त्याचप्रमाणे लोकांना सुविधादेखील मिळण्यास उशीर होतो. केंद्र सरकार विविध प्रकल्पांना मान्यता देत असून राज्याने देखील याचा फायदा करून घेतला पाहिजे आणि पाठपुरावा करून योजना मार्गी लावल्या पाहिजेत यावर मुख्यमंर्त्यांनी आजच्या बैठकीत भर दिला.

५०८ किमी लांबीचा प्रकल्प
मुंबई ते अहमदाबाद अशी ५०८.१७ कि.मी. लांबीचा बुलेट ट्रेन प्रकल्प असून यासाठी १ लाख ८ हजार कोटी रुपये खर्च आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात मिळून एकूण १२ स्थानके असून महाराष्ट्रात त्यातील ४ स्थानके आहेत. यासाठी एमएमआरडीएमधील ४.८ हेक्टर जागा भूमिगत स्थानकासाठी ३० सप्टेंबरपर्यंत उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही एमएमआरडीएने करण्याचे निर्देश एकनाथ श्ािंदे यांनी दिले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या