29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रबूस्टर डोसच्या नावाखाली सायबर हॅकर्सकडून फसवणूक

बूस्टर डोसच्या नावाखाली सायबर हॅकर्सकडून फसवणूक

एकमत ऑनलाईन

नाशिक : सध्या जगभरात डेल्टासोबतच ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सरकारने कोरोना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. युवकांना लस व वरिष्ठांना बूस्टर डोसबाबतही आवाहन केले जात आहे. परिणामी सर्वांकडून लसीकरणासाठी घाई-गडबड केली जात आहे. मात्र याचा फायदा घेत सायबर हॅकर्सकडून फसवे कॉल करून नागरिकांची फसवणूक केली जात आहे, अशी माहिती नाशिकचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.
अनेक नागरिकांना बूस्टर डोससाठी फसवे कॉल येत आहेत. त्यांच्याकडून मोबाईलवर ल्ािंक पाठवून माहिती भरून घेतली जात आहे. ही माहिती भरल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी क्रमांक येतो. हा ओटीपी क्रमांक तुमच्याशी बोलणारी व्यक्ती मागून घेते. त्यानंतर खात्यातील पैसे रिकामे होत आहेत. हे ध्यानात घेता नागरिकांनी अशा कॉलपासून सावध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

नागरिकांना बूस्टर डोसच्या नावाखाली कॉल आला तरीसुद्धा ही फसवणूक टाळता येऊ शकते. त्यासाठी फक्त थोडे दक्ष रहावे लागेल. कुठलाही फोन आला आणि समोरच्याने आपली व्यक्तिगत माहिती मागितली, तर ती देऊ नका. कारण कुठल्याही सरकारी योजनेसाठी अशी फोनवरून माहिती मागितली जात नाही. लसीकरणासाठी तर नाहीच नाही. सोबतच नागरिकांनी आपल्या खात्याची, एटीएम क्रमांक, एटीएम कार्डच्या क्रमांकाचीही माहिती कोणालाही शेअर करू नये. स्वत:च्या मोबाईलवर आलेली कसलीही ल्ािंक उघडू नये, ओटीपी कोणाला सांगू नये, आदी सूचनाही सचिन पाटील यांनी केल्या आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या