मुंबई : चित्रपट निर्माते बोनी कपूर सायबर फसवणुकीच्या जाळ््यात अडकले आहेत. बोनी कपूर यांच्या बँक खात्यातून सुमारे ४ लाख रुपये चोरीला गेले आहेत. या प्रकरणी बोनी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मुंबईतील आंबोली पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. निर्माता बोनी कपूर यांच्या क्रेडिट कार्डद्वारे ही फसवणूक झाली आहे. ५ फसव्या व्यवहारातून ही रक्कम वर्ग करण्यात आली.