26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रभंडारा-गोंदिया बलात्कार प्रकरण; बेजबाबदार पोलिसांचे निलंबन : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भंडारा-गोंदिया बलात्कार प्रकरण; बेजबाबदार पोलिसांचे निलंबन : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एकमत ऑनलाईन

मुंबई : भंडारा-गोंदिया बलात्कार प्रकरणाचे आज सभागृहात पडसाद उमटल्याचे पाहायला मिळालं. भंडाऱ्यातील सामूहिक बलात्काराची घटना ही अत्यंत लाजिरवाणी असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. या घटनेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत निवेदन दिले. पीडितेसोबत घडलेल्या गुन्ह्याची फडणवीसांनी सभागृहात आज माहिती दिली. दरम्यान, खाण्यासाठी पोलीस स्टेशनमधून महिला बाहेर पडली होती. त्यावेळी तिच्यावर अत्याचार झाले. दरम्यान, या घटनेबाबत बेजबाबदार पोलिसांचे निलंबन केलं असल्याची माहिती देखील फडणवीसांनी दिली आहे. या घटनेतील आरोपी सापडेपर्यंत चौकशी थांबणार नसल्याचेही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी सापडेपर्यंत चौकशी थांबणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. साधारणत 30 तारखेला ही महिला घरातून निघून गेली होती. रात्रीपर्यंत ती फिरत होती. त्याच्यानंतर तिला एका ड्रायव्हरने घरी सोडतो असे सांगतिले. त्यानंतर त्याने तिला धमकावून तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तिला भंडारा जिल्ह्यातील लाखणी परिसरात सोडले. त्यानंतर तेथील महिला पोलीस पाटलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी संबंधीत पोलीस स्टेशनला फोन करुन माहिती दिली. त्यानंतर त्या महिलेला पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. महिला पोलिसांनी काय झालं त्याबाबत विचारले मात्र, ती त्यावेळी सांगण्याच्या मनस्थिती नव्हती. सकाळी साडेसात वाजता चहा पिण्यास जाते असे म्हणून पीडित महिला स्टेशनमधून बाहेर पडली होती. संध्याकाळी ती कारधा इथं पोहोचली. त्यावेळी तिथं आलेल्या दोघांनी घरी सोडतो असे सांगून तिला जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. त्यानंतर पीडित महिलेने आरडाओरड केल्यानंतर आरोपींनी पीडितेला रस्त्यावर आणून ते पळून गेल्याचे फडणवीस म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या