23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रभरत गोगावलेंच्या गाडीचा फ्री वेवर अपघात

भरत गोगावलेंच्या गाडीचा फ्री वेवर अपघात

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रतोद असलेले आमदार भरतशेठ गोगावले यांच्या गाडीचा मुंबईत अपघात झाला आहे. भरत गोगावले यांची गाडी फ्री वेवरून जात असताना हा प्रकार घडला. यावेळी फ्री वेवरून जात असलेल्या जवळपास ८ गाड्या एकमेकांवर धडकल्या. सुदैवाने या अपघातामध्ये भरत गोगावले यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या अपघातानंतर भरत गोगावले मंत्रालयात दाखल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील गाडीचाही अपघात झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट दिल्यानंतर ते पावसाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट देण्यासाठी रवाना झाले.

यावेळी पालिकेच्या मुख्यालयाजवळ येताना त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला होता. यामध्ये कोणीही जखमी झाले नव्हते. ताफ्यातील एका कारने पुढच्या कारला मागून जोरदार धडक दिली. पुढच्या कार चालकाने आपत्कालीन ब्रेक दाबल्याने हा प्रकार घडला होता.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर सुरुवातीला त्यांच्यासोबत जाणा-या मोजक्या आमदारांमध्ये भरत गोगावले यांचा समावेश होता. एकनाथ शिंदे गटाने गुवाहाटीत असताना भरत गोगावले यांना मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी दिली होती. त्यानंतर संपूर्ण बंडाच्या काळात भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे गटाची बाजू व्यवस्थितपणे सांभाळली होती.

भरत गोगावले हे शिवसेनेच्या कोकणातील प्रमुख आमदारांपैकी एक आहेत. शिंदे गटाच्या इतर आमदारांप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसवर दोषारोप करत भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. आगामी मंत्रिमंडळात किंवा महामंडळांच्या वाटपात भरत गोगावले यांना एखादी महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या