18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रभिषण कार अपघातात महिला डॉक्टरचा मृत्यू

भिषण कार अपघातात महिला डॉक्टरचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

यवतमाळ : दिवाळी निमित्त हैदराबाद येथून मित्राला भेटल्यानंतर परत येत असताना भरधाव वेगात निघालेल्या आलिशान कारचे टायर फुटल्याने झालेल्या भिषण अपघातात यवतमाळ येथील प्रसिद्ध स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भिषण होता, की आलिशान कार अक्षरश: चक्काचूर झाली.

निर्मलपासून काही अंतरावर टोल नाक्याजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. या अपघातात पूजा पीयूष बरलोटा (१६), अतिथी (१८) आणि मिनल (४०) यांच्यावर निर्मल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात होताच डॉ. पीयूष बरलोटा यांनी फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. घटनेची माहिती मिळताच हैदराबाद येथील डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले. या घटनेने यवतमाळच्या वैद्यकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या