23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रमंत्रिपदाला न्याय कसा देतो महत्त्वाचे

मंत्रिपदाला न्याय कसा देतो महत्त्वाचे

एकमत ऑनलाईन

मंत्र्यांच्या नाराजीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मत
मुंबई : खात्याला न्याय कसा देतो हे महत्त्वाचे आहे, असे मोठे विधान करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांच्या नाराजीवर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून खातेवाटपही जाहीर झाले आहे. शिंदे गटात नाराजी असताना भाजपमध्येही मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे अनेक मंत्री नाराज असल्याची चर्चा रंगली.

खातेवाटपात भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य या खात्यांवर समाधान मानावे लागले आहे, तर काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल खाते देण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटी खाते कोणते आहे, यापेक्षा या खात्याला आपण न्याय कसा देतो हे महत्त्वाचे आहे, असे म्हटले. ज्या ज्या विभागाची जबाबदारी, ज्या ज्या मंत्र्यांवर दिली, ते नक्कीच ती जबाबदारी यशस्वी पार पाडतील. या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देतील. एकदा मंत्री झाल्यानंतर तो एका विशिष्ट भागाचा मंत्री नसतो तर संपूर्ण राज्याचा मंत्री असतो. त्यामुळे राज्यभर आमच्या मंत्र्यांच्या माध्यमातून विकास केला जाईल. सामान्य लोकांना न्याय दिला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मी नाराज नाही : दादा भुसे
खातेवाटपाबाबत मी नाराज नाही. मागील सरकारच्या काळात मी कृषिमंत्री होतो. पण प्रवास करत असताना दगदग सहन होत नव्हती. त्यामुळे त्यावेळीसुद्धा खाते बदलून मिळावे, अशी विनंती केली होती. आताही प्रकृतीच्या कारणामुळे आपण स्वत:च मागणी करून कृषी मंत्री पदाऐवजी अन्य मंत्री पद घेतले. आता या पदाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार, असे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या