23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रमंत्र्यांच्या घरासमोर हरभरा उलथणार

मंत्र्यांच्या घरासमोर हरभरा उलथणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : केंद्राने अचानक किमान आधारभूत दराने हरभरा खरेदी बंद केल्याने राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने केंद्राने हरभरा खरेदी थांबविली. यामुळे चांगल्या प्रतीचा हरभरा हमीभावापेक्षा कमी दरात विक्री होत आहे. दरम्यान केंद्र सरकारने हरभरा खरेदी पुन्हा सुरु करावी, राज्य सरकारनेही हरभरा उत्पादक शेतक-यांबाबत योग्य पावले उचलावीत, अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचे आंदोलन केले जाईल, असा इशारा किसान सभेच्या अजित नवले यांनी दिला आहे.

यावेळी किसान सभेचे नेते अजित नवले यांनी जोरदार टीका केली. हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करून दिलेल्या मुदतीपूर्वीच नाफेडने हरभरा खरेदी बंद केली आहे. हरभरा उत्पादक शेतकरी सरकारच्या या कृतीमुळे हवालदिल झाले आहेत. राज्यभर खरेदी केंद्रांवर हजारो वाहने उभी असताना अचानक खरेदी बंद केल्याचे सांगण्यात आल्याने शेतक-यांची मोठी कोंडी झाली आहे. वाहनांचे भाडे दररोज वाढत असून नाईटचार्ज भरावा लागत असल्याने व खरेदी होईल, याची शाश्वती नसल्याने शेतकरी काकुळतीला आल्याचे किसान सभेचे नेते नवले म्हणाले.

राज्यात नाफेडद्वारे ५ हजार २३० रुपये प्रति क्विंटल दराने हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरु होती. खुल्या बाजारात ४ हजार २०० रुपये दर मिळत असल्याने शेतक-यांनी नाफेडला हरभरा विकण्याचा पर्याय निवडला होता. नाफेडकडे रीतसर नोंदणी केल्यानंतर शेतक-यांना एस.एम.एस. पाठवण्यात आले होते. रीतसर एस.एम.एस. आलेल्या शेतक-यांनी वाहने भाड्याने करुन आपला माल खरेदी केंद्रांवर आणला असताना आता खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण सांगून खरेदी नाकारली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या