22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रमढ स्टुडिओ घोटाळा; सोमय्यांकडून पाहणी

मढ स्टुडिओ घोटाळा; सोमय्यांकडून पाहणी

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईच्या मढ येथील एक हजार कोटींच्या स्टुडिओ घोटाळ्यांची भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह भाजप नेते गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, योगेश सागर आणि इतर काही पदधिकारी यांनी आज पाहणी केली आहे. कथित स्टुडिओ घोटाळावरून किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय त्यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

दरम्यान, सीआरझेड नियमांचे येथे उल्लंघन झाले आहे. सहा महिन्यांची तात्पुरता सेट लावण्याची परवानगी असताना इथले बांधकाम आहे तसेच कसे राहिले? हा प्रश्न उपस्थित १००० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मढ मार्वे परिसरात पाच स्टुडिओंचा सेट आहे. या परिसरात स्मशान भूमी उभारण्याची परवागणी देण्यात आली नाही. मग स्टुडिओ कसे उभारले गेले? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. याच मुद्यावरून अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या