24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रमला निवृत्ती हवी : राज्यपाल कोश्यारी

मला निवृत्ती हवी : राज्यपाल कोश्यारी

एकमत ऑनलाईन

अहमदनगर : मागील काही महिन्यांपासून आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. मला निवृत्त व्हायचे आहे. मात्र, मी राज्यपालपदावर काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालपदावर सेवाभावी कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

अहमदनगरमधील स्रेहालय संस्थेच्यावतीने युवा प्रेरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल कोश्यारी म्हणाले की समाज सुधारवण्याचे काम युवकांना करावे लागणार आहे. मला निवृत्ती मिळायला हवी पण तरीही मी या राज्यपालपदावर काम करतोय. खरे तर पंतप्रधान मोदींनी माझ्यापेक्षा स्रेहालय संस्थेच्या गिरीश कुलकर्णी यांच्यासारख्या व्यक्तीला राज्यपाल करायला. त्यांनी समाजासाठी खूप मोठ काम केले असल्याचेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या