22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रमशाल चिन्हावरच निवडणूक लढवणार : ऋतूजा लटके

मशाल चिन्हावरच निवडणूक लढवणार : ऋतूजा लटके

एकमत ऑनलाईन

मुंबई : आपल्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. माझे पती रमेश लटके यांची निष्ठा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत होती. त्यामुळे निवडणूक लढणार ती मशाल चिन्हावरच असे ऋतुजा लटके यांनी गुरुवारी स्पष्ट केले पालिका आयुक्तांना भेटण्यासाठी त्या महापालिका कार्यालयात आल्या होत्या.

या घडामोडीत अंधेरी पोटनिवडणुकीत मंत्रीपदाची ऑफर देऊन ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतूजा लटके यांच्यावर शिंदे गट दबाव टाकत असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला होता. ऋतुजा लटके यांनी महापालिकेतील नोकरीचा राजीनामा दिला होता. पण तो राजीनामा मंजूर न करण्यासाठी आयुक्तांवर शिंदे गट दबाव टाकत असल्याचा आरोपही ठाकरे गटानेकेला होता.

शिंदे गटही निवडणूक लढवणार
अंधेरी पोटनिवडणूक शिंदे गट लढवणार असल्याची माहिती मिळतेय. अंधेरीची मूळ जागा शिवसेनेची असल्याने भाजप शिंदे गटाला जागा देण्याबाबत विचार करत आहे. शिंदे गटाला जागा मिळाल्यास अंधेरीत शिंदे विरूद्ध ठाकरे गट सामना रंगणार आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या