26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्र‘महाऊस नोंदणी अ‍ॅप’चे अनावरण

‘महाऊस नोंदणी अ‍ॅप’चे अनावरण

एकमत ऑनलाईन

पुणे : यापुढील काळात उस उत्पादक शेतक-यांना साखर कारखान्यामध्ये ऊसाच्या नोंदणीसाठी जावे लागणार नाही तर उपलब्ध ऊसाची नोंदणी साखर कारखान्याकडे करण्यासाठी मराठी भाषेतील महाऊस नोंदणी अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.

त्याचे अनावरण राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले . साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि सहकार आयुक्त अनिल कवडे तसेच सहसंचालक पांडुरंग शेळके आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गेल्या काही गाळप हंगामात नोंदणो विना शिल्लक ऊसाबाबत अनेक तक्रारी आयुक्तालयाकडे आल्या आहेत . ऊसाची नोंदणी न झाल्याने शेतामध्ये ऊस वाया गेल्याने शेतक-यांचे आर्थिक नुकसान झाले .या यंत्रामध्ये शेतक-यांना तीन पर्याय देण्यात आले आहेत तिन्ही ठिकाणी ऊसाची नोंदणी करता येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या