31.9 C
Latur
Monday, January 25, 2021
Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील गुंतवणूक, चित्रपट उद्योग उत्तर प्रदेशात नेण्याचा भाजपच्या कुटील डाव!

महाराष्ट्रातील गुंतवणूक, चित्रपट उद्योग उत्तर प्रदेशात नेण्याचा भाजपच्या कुटील डाव!

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी उर्फ अजयकुमार बिश्त मुंबईत येऊन महाराष्ट्राच्या उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांची भेट घेणार आहेत. उद्योजक, बॉलिवूड निर्मात्यांना धमकावण्याचा व उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक नेण्याचा डाव आहे. हा कुटील डाव वेळीच ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारने राज्यातील उद्योगक तसेच बॉलिवूडच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उद्योजक, बॉलिवूड यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र मागील काही महिन्यापासून केले जात आहे. एनसीबीच्या माध्यमातून बॉलिवूडला बदनाम करण्याचे प्रयत्न सुशांतसिंग प्रकरणापासून सुरू आहेत. मोदी सरकारच्या मदतीने महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या मोहिमेत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अजकुमार बिष्ट यांचाही पुढाकार राहिलेला आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न २०१४ पासूनच होतो आहे.

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र असेच षडयंत्र करुन गुजरातला नेले. आता बॉलिवूडचे महत्व कमी करुन उत्तर प्रदेशमध्ये दुसरा चित्रपट उद्योग निर्माण करण्याचा डाव आहे. त्यांच्या मुंबई भेटीत ते अशीच भीती दाखवून महाराष्ट्रातील गुंतवणूक व बॉलिवूड उत्तर प्रदेशला नेण्यासाठी घाट घालतील. महाराष्ट्राची अधोगती करण्याचा त्यांचा कुहेतू लक्षात घेऊन मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच महाविकास आघाडी सरकारने उद्योगपती व बॉलिवूडच्या पाठीशी खंबरपणे उभे राहण्याची गरज आहे, असं मत सावंत यांनी व्यक्त केले.

अजयकुमार बिश्त यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेशात कायदा सुव्यव्यस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत. दलित, महिला, अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार वाढल्याचे देशाने पाहिले आहेत. दिवसाढवळ्या बलात्कार होत आहेत. सामाजिक एकोपा राहिलेला नसून उत्तर प्रदेश हे उत्तम प्रदेश नसून जंगलराज झाले आहे. बिश्त यांच्यामुळे विद्वेषाचे वातावरण उत्तर प्रदेशमध्ये निर्माण झाले आहे. आता केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रातील वातावरण दुषीत करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, असेही सावंत म्हणाले. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील उद्योजकांमध्ये षडयंत्राने दहशत निर्माण करण्याऐवजी स्वतःच्या राज्यात उद्योगांकरिता अनुकूल वातावरण तयार करावे, असा सल्लाही सावंत यांनी दिला.

 

वडसा, गोकुळ, बोंडगव्हाण शिवारात शेकडो ब्रास रेतीचे ढिगारे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या