26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र सल्लागार मंडळाची स्थापना करणार

महाराष्ट्र सल्लागार मंडळाची स्थापना करणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्र सल्लागार मंडळाची स्थापना करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील आरोग्य, शिक्षण आणि कृषी विभाग डोळ््यासमोर ठेवून सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. या सल्लागार मंडळात आरोग्य, शिक्षण आणि कृषी विभागातील निवृत्त अधिकारी आणि तज्ज्ञांचा समावेश असणार आहे.

महाराष्ट्र सल्लागार मंडळ हे राज्य सरकारला आरोग्य, शिक्षण आणि कृषी या तीन विभागाच्या संदर्भात मार्गदर्शन करणार करणार आहे. हे मंडळ स्थापन झाल्यानंतर मंडळातील तज्ज्ञ, मुख्यमंत्री आणि विभागाशी संबंधित अधिका-यांच्या नियमित बैठका होणार आहेत. राज्यातील आरोग्य, शिक्षण आणि कृषी या तीन क्षेत्रावर शिंदे सरकारकडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. राज्यातील शेतक-यांना येणा-या अडचणी आणि प्रश्न प्रशासनाने समजून घेण्याकरता आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल यांनी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. यानिमित्ताने प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी संपूर्ण एक दिवस शेतक-यांंसोबत व्यतीत करुन शेतकरी समस्यांच्या मुळापर्यंत जाणार आहेत.

‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमात प्रधान सचिव, कृषी आयुक्त, कृषी विद्यापीठाचे कुलगुरु, शास्त्रज्ञ, विभागीय आयुक्त, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक आणि इतर उपविभागीय व तालुकास्तरीय अधिका-यांनी भेट देण्याच्या सूचना आहेत. त्यात कृषी विभागाच्या अधिका-यांनी महिन्यातून तीन दिवस तसेच महसूल, ग्रामविकास आणि इतर विभागाच्या अधिका-यांनी महिन्यातून एक दिवस भेट द्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या